ठाणे पालिकेनंतर आता मुंबई पालिकेचा कर्मचारी बँक खात्यांबाबत हा निर्णय?
मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांची बँक खाती अन्य दुसऱ्या बँकेत उघडण्याबाबत चर्चा होत आहे.
मुंबई : महापालिका कर्मचाऱ्यांची बँक खाती अन्य दुसऱ्या बँकेत उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे महापालिकेच्या निर्णयानंतर आता मुंबई महापालिकेने हा निर्णय घेण्याची तयारी दर्शविली आहे. आम्ही खासगी बँके ऐवजी राष्ट्रीयकृत बँकेत पालिका कर्मचाऱ्यांचे पगार सुरक्षित राहावे, यासाठी प्रयत्नशिल आहोत, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार आता दुसऱ्या बँकेत होणार, याला दुजोरा मिळत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या हजारो रुपयांच्या ठेवी तसेच अग्निशमन दल कर्मचाऱ्यांची वेतन खातीही अॅक्सिस बँकेतून काढून राष्ट्रीयीकृत बँकेत नेण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
ठाणे पालिका, अमृता फडणवीसांना जोरदार धक्का
पालिका कर्मचाऱ्यांनी बँके खाती राष्ट्रीयकृत बँकेत उघडण्यात येतील, याला खुद्द महापौर किशोरी पेडणेकर यांनी याला दुजोरा दिला आहे. राष्ट्रीयीकृत बँका सुरक्षित असल्याने आम्ही त्याबद्दल विचार करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. खासगी बँका डुबल्यावर कोणी खातेदारांच्या पैशाची जबाबदारी घेत नाही, त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये जायला हवे, तसा प्रस्ताव आला तर माझे समर्थन राहिल. सध्या केवळ अँक्सिस बँक दिसतेय, बाकी बँकांकडे लक्ष वळवले जाईल, असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्यात.
करदात्यांचा पैसा आणि ठेवी रूपाने तो खासगी बँकेत असून पुढे काहीही घडू शकते, त्यामुळे सर्वांचा विचार घेवून ठरवू, असेही त्यांनी स्पष्ट केली. त्याचवेळी यात कोणतेही राजकारण नाही, असे सांगत अमृता फडणवीस यांना जोरदार टोला लगावला. दरम्यान, अमृता फडणवीस त्या बँकेत आहेत म्हणून असे केले जात आहे का, असा सवाल करताच त्या म्हणाल्यात, तुम्ही उगाच कुठले तरी सूत कुठे जोडू नका. त्या बँकर आहेत, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आहेत. दुसऱ्या एका प्रश्नावर त्या म्हणाल्यात, मला माहिती नाही, त्या राजकारणात येत आहेत का, हा प्रश्न तुम्हीच विचारा, त्याच उत्तर देतील. अनेक मुख्यमंत्र्यांच्या सत्ता गेल्यानंतर त्यांच्या महिलांनी कधी राजकारणात भाग नाही घेतला. आरोपांवर आरोप करून नवी ओळख होत नाही, दुसऱ्या एका प्रश्ना किशोरीताई म्हणाल्यात.
<iframe allow="https://zeenews.india.com/marathi/video/shirol-ghalwad-farmers-taking-cattle-to-safe-place-to-protect-them-from-flood-situation/483844" "="" frameborder="0" height="350" src="https://zeenews.india.com/marathi/live/embed" width="560">